मुंबई/ प्रतिनिधी
दिनांक/२४ फेब्रुवारी
बहुजन समाज पार्टी तर्फे बीएसपी भवन मुंबई येथे कोकण झोन ची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेश अध्यक्ष ऍड सुनील डोंगरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडली, सदर बैठकीत कोकण झोन चे मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हयातील सर्व पदाधिकारी कोकण झोन बामसेफ संयोजक शंकर दयाल व प्रदेश सचिव फुलचंद कीटके उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रदेश अध्यक्ष ऍड सुनील डोंगरे यांनी बीएसपी राष्ट्रीय अध्यक्ष बहेन मायावती यांनी दिलेला संदेश उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते पर्यंत पोहचवला,
बहेन मायावतीजी ह्यांच्या दिशानिर्देशनानुसार महाराष्ट्र प्रदेश मध्ये काम सुरळीत व्हावे यासाठी प्रदेश चे ३६ जिल्ह्याचे ६ झोन मध्ये वाटप करण्यात आले.
पुणे झोन, कोकण प्रदेश झोन, नाशिक झोन, पूर्व विदर्भ झोन, पश्चिम विदर्भ झोन आणि मराठवाडा झोन.
अशाप्रकारे झोन निर्मिती केल्याने काम करण्यास सोपे होणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष ऍड सुनील डोंगरे ह्यांनी सांगितले, त्यानुसार कोकण झोन प्रभारी पदी चार मोठ्या पदाधिकारी लोकांना नियुक्ती करण्यात आली असून ह्यांचा पदभार किरण आल्हाट, राजेंद्र आयरे, राजपाल गावंडे, सचिन रुके ह्यांना देण्यात आला.