रायगड जिल्ह्यात बीएसपी तर्फे बहन मायावती यांचा वाढदिवस जोशात साजरा!

पनवेल/ प्रतिनिधी 

दिनांक १५ जानेवारी रोजी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहेन मायावती यांचा ६९ वा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने संपूर्ण देशात हा दिवस जन कल्याणकारी दिवस म्हणून बीएसपी कार्यकर्त्यांद्वारे साजरा केला जातो कारण, त्या उत्तरप्रदेश राज्याच्या ४ वेळा झालेल्या मुख्यमंत्री असून फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा मजबूत करणाऱ्या एक सामाजिक क्रांतीची मशाल पेटत ठेवणाऱ्या अशा नेत्या आहेत त्यांना टाइम्स ने आयरन लेडी हे नाव संबोधुन त्यांचा गौरव केला होता.. आजही त्या देशातील संपूर्ण दलीत, शोषित, वंचीत पिडीत समाजासाठी काम करत असून ह्या त्यांच्या देशातील एकमेव नेत्या आहेत..





बहेन मायावती ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील पनवेल पासून तळा, माणगाव, श्रीवर्धन पर्यन्त बहुजन समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस जोशात साजरा केला. त्यावेळी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश सचिव फुलचंद कीटके, रायगड जिल्हा अध्यक्ष केशव साळवी, जिल्हा कोषाध्यक्ष गणेश उके, मीडिया प्रभारी कपिल सोरटे, विधानसभा अध्यक्ष खंडू लहाने, उपाध्यक्ष निलेंद्र दहाट, सचिव जैस्वार, बामसेफ चे एल यू लिंगायत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.