अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री) ह्यांच्या विरोधात बीएसपी तर्फे पनवेल मध्ये धरणे आंदोलन!
पनवेल/प्रतिनिधी 
दिनांक २४ डिसेंबर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान, आंबेडकर - आंबेडकर - आंबेडकर बोलणे आता फॅशन झाले आहे आणि आंबेडकरांचे नाव घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते तर स्वर्गात जागा मिळाली असती. असे भाष्य करून देशातील संपूर्ण वंचित शोषित आणि बहुजन समाजासाठी देव असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान व अपमान केल्याप्रकरणी तसेच Conduct of Election Rules 1961 मधून जो 93(2)B clause बदललेला आहे तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपमान आहे. त्यासाठी बीएसपी रायगड जिल्हा युनिट तर्फे पनवेल मध्ये धरणे आंदोलन करून  नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.