बहुजन समाज पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष पदी श्री.केशव साळवी ह्यांची निवड!
पनवेल/ प्रतिनिधी 
आज दि. २२ डिसेंबर रोजी बहुजन समाज पार्टी च्या रायगड जिल्हा मुख्य कार्यालय नवीन पनवेल येथे पक्षाची समीक्षा बैठक पार पडली, सदर बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव राजपाल गावंडे, फुलचंद किटके, जिल्हा प्रभारी ऍड अनिल नागदेवे, जिल्हा कोषाध्यक्ष गणेशजी ऊके, जिल्हा मिडिया प्रभारी कपिल सोरटे, मीना गायकवाड, गजेंद्र अहिरे, खंडू लहाने, राजू दहाट, आनंद गायकवाड, संदीप जाधव, जीतरत्न जाधव, लिंगायत सर, आयुब शाह व नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणुक लढवलेले पनवेल, कर्जत, उरण, पेण मधील सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीत नव्याने जिल्हा व विधानसभा नियुक्त्या करण्यात आल्या. कर्जत विधानसभा अध्यक्ष पदी श्री.अमोल कांबळे ह्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष पदी बामसेफ चे वरिष्ठ प्रचारक श्री. केशव साळवी ह्यांची नियुक्ती करण्यात आली.