SC/ST उपवर्गीकरण तसेच क्रिमिलयेर निषेधार्थ बीएसपी तर्फे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून निवेदन!

रायगड/प्रतिनिधी 

     बहुजन समाज पार्टी रायगड जिल्ह्याच्या वतीने आज दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी  सर्व तालुका ,विधानसभा स्तरीय क्षेत्रात पनवेल, उरण , कर्जत - खोपोली, श्रीवर्धन - तळा  विधानसभा तर्फे तेथील तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी येथे ,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती यांची जातीय उपवर्गीकरण करून त्यांच्यावर क्रिमिलेयर लादून त्यांना कमकुवत करण्याचे कारस्थान केले आहे या विरोधात भारत बंद चे आवाहन करत जाहीर निवेदन देण्यात आले. 






१ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलने, उठाव होत आहेत म्हणूनच बहूजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहेन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात जिल्हा,तालुका प्रशासकीय कार्यलयात निवेदन देण्यात येत आहेत.