गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी येरवडा जेल पुणे येथे झाला. हा करार "आंबेडकर-गांधी करार" किंवा "गांधी-आंबेडकर करार", "येरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.
-----------
पुणे करार : विधिमंडळातील अस्पृश्यांच्या राखीव जागांसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यात २४ सप्टेंबर १९३२ रोजी झालेला करार. १९३१ च्या अखेरीस झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्यांकांच्या प्रतिनिधित्वाचा विचार झाला . मुसलमान व शीख यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे गांधीकांग्रेसने आधीच मान्य केले होते. मुसलमान वगळता उरलेल्या सवर्ण हिंदूंकरवी अस्पृश्यांना योग्य प्रतिनिधित्व व रास्त राजकीय हक्क मिळणे अशक्य वाटल्यावरुन डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राखीव जागांचा व विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला. गांधींनी त्यास विरोध केला. याचा निर्णय ब्रिटिश पंतप्रधान जेम्स मॅक्डाॅनल्ड यांच्याकडे सोपविण्यात आला.
पंतप्रधानांनी १४ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर करून डॉ. आंबेडकरांची मागणी मान्य केली. गांधींनी त्याविरुद्ध २० सप्टेंबर १९३२ पासून प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्यांच्या मते, अस्पृश्यता हा हिंदूंचा अंतर्गत, नैतिक व धार्मिक प्रश्न होता, राजकीय नव्हे. अस्पृश्यांचे विभक्त मतदारसंघ हिंदू समाजाचे विघटन तर करतीलच, शिवाय अस्पृश्यांनाही त्यातून लाभ होणार नाही. वीस वर्षे स्वतंत्र मतदारसंघ, दुहेरी मताधिकार व त्यांचे परस्पर मतावलंबन यांमुळे अस्पृश्यांना आपल्या हक्कांचे व हितसंबंधांचे रक्षण करता येईल, अशी सरकारची भूमिका होती. डॉ. आंबेडकरांना गांधींचे प्राण मोलाचे वाटत होते तरी सहा-सात कोटी बांधवांचे राजकीय भवितव्य अधिक मोलाचे आहे, अशी त्यांची भूमिका होती. म. गांधींच्या प्रायोपवेशनामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी दडपण आले. तारा, पत्रे, भेटी, निंदा, धमक्या यांचा वर्षाव झाला. मतपरिवर्तनापेक्षा दडपणाखाली ते तडजोडीस तयार झाले. बॅरिस्टर मु. रा. जयकर, तेजबहादुर सप्रू, पंडित मदनमोहन मालवीय प्रभृतींच्या मध्यस्थीला यश येऊन पुणे करार झाला.
मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 1932 टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात गांधी कांग्रेस ने एक बातमी प्रसिद्धीस दिली• *गांधीजी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या विरोधात पुण्यातील येरवडा जेल येथे प्राणांतिक उपास करणार आहेत*
गांधीजीच्या आमरण उपवासाची देशभर उमटलेली तीव्रता आणि डाॅ आंबेडकरांवर होणारे प्राणघातकी हल्ले पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी एक पब्लिक स्टेटमेंन्ट दिले. गांधीजीच्या आडमुठेपणामुळे मला खलनायक बनविण्यात आले आहे. माझ्या समाजाच्या न्याय व हिताच्या रक्षणासाठी एखाद्या रस्त्यावील कंदीलाच्या खांबावर मला तात्काळ फाशी दिली तरी मी त्याची मुळीच पर्वा बाळगणार नाही•
*अस्पृश्याना स्वतंत्र मतदारसंघ मिळू नयेत एवढ्या बाबतीतच गांधी हे विरूध्द नसून अस्पृश्याना स्वाभिमानी आणि स्वावलंबी स्वतंत्र प्रतिनिधि मिळू नयेत असाही गांधीजींचा कटाक्ष आहे* असा डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा ठाम विश्वास होता• गांधी कांग्रेसची लबाडी *What Congress and Gandhi have done to the Untouchables?* (काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ च्या जून महिन्यात प्रसिद्ध केलेला हा वैचारिक ग्रंथात प्रखरतेने मांडली आहे• या ग्रंथाच्या नावात *‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्याचे किती नुकसान केले?* असाच गर्भीत अर्थ निघतो. हा गर्भित अर्थ सिद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब या ग्रंथात विपुल माहिती व आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आधाराने त्यांनी काँग्रेस आणि गांधी यांच्या राजकीय, सामाजिक धार्मिक व आर्थिक योजनासंबंधी चिकित्सक व टीकात्मक विचारसरणीने प्रकाश टाकलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर २९ सप्टें १९३४, मुंबई येथील भाषणात सांगतात की,
*" मुसलमानांना मी हवे ते देईन, ख्रिश्चन समाजास मी जरूर देईन, युरोपियन किंवा अँग्लो इंडियनांचे हक्क मी मान्य करिन, शिखास मी त्यांच्या मागण्या बहाल करीन, पण अस्पृश्य समाजाचे हक्क मी काडी इतकेही मान्य करणार नाही."*
असा रोखठोक जबाब मला महात्मा गांधीकडून मिळाला व मी विस्मित झालो. महात्मा गांधींच्या या कृतीस मला इतिहासात उदाहरण मिळत नाही, पण महाभारतातील एक प्रमुख प्रसंगाची स्मृती झाल्याशिवाय राहत नाही. कौरव पांडवांचे भांडण विकोपास न जाता सलोख्याने मिटावे व रक्तपात टाळावा या उद्धेशाने श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे भारतीय युद्धापुर्वी शिष्टाई केली होती, हे आपणा सर्वाना माहीत आहे. त्यावेळी दुर्योधनाने,' पाच पांडवांना अर्धे राज्य काय पण पाच गावे देखील देण्यास आपण तयार नाही", असे स्पष्ट सांगितले. त्याचप्रकारचा जवाब मला मिळाला. यानंतरचा इतिहास आपणास विदितच आहे.
अस्पृश्य समाजाचे न्याय हक्क ब्रिटिश सरकारने मान्य करून त्याहक्काच्या आधारे जातीय निर्णयात त्यांना स्थान दिले. हा निर्णय जाहीर होताच केलेल्या पापाचे क्षालन करण्याकरिता म्हणा अगर *मनाची जळजळ* शांत करण्याकरिता म्हणा किंवा त्यांच्या समजुतीने झालेल्या *अन्यायाचे परिमार्जन* करण्याकरिता म्हणा, म गांधींनी प्राणांतिक उपवास केला व त्या उपवासाचा शेवट *पुणे करारात* झाला हे सर्वश्रुत आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर(२९ सप्टें १९३४, मुंबई)
संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग १ पा ४२१
---------------------------------
*जाणून घ्या "पुणे करार"*
----------------------------------
*पुणे करारा मध्ये असे काय होते की त्यामुळे गांधीजीला अमरण उपोषणाला बसावे लागले.*
*१* स्वतंत्र मतदार संघ (seprate electrate)
SC | ST च्या उमेदवाराला मत देण्याचा आधिकार फक्त SC|ST च्याच लोकांनाच राहील.
*२*
दुहेरी मतदान (दोन वेळा) मत देण्याचा आधिकार
( dualvote system)
SC | ST च्याच उमेद्वाराला त्यांच्या लोकांकडून आपला प्रतिनिधी निवडून आणण्याचा आधिकार राहील.
उदा : एखाद्या विभागातुन *sc* चा उमेदवार उभा
असेल तर त्याला *sc* कास्टचेच लोक मतदान करु
शकतात. sc | st च्या उमेद्वाराला त्यांचेच लोक मतदान करतील.
*३* प्रोढ़ मताधिकार ( adult
pranchise ) २१ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तिलाच
मतदानाचा आधिकार असेल. इंग्लंड च्या पार्लमेंट मध्ये मतदान कोणी करावे याच्यावर चर्चा सुरु होती. या चर्चेचे डॉ, आंबेडकरांना ही निमंत्रण होते. त्या चर्चेसाठी बाबासाहेबांना बोलावण्यात आले. इंग्रजांनी मुद्दा मांडला की जे लोक income tax भरत असतील तेच वोट करतील. त्यांचा मुद्दा बाबासाहेबांनी मोठ्या शिताफीने खोडला. ते म्हणाले की भारतीय लोक अशिक्षित आणि गरीब आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही. त्या मुळे incomtax भरण्याचा प्रश्नच येत नाही आणि भारतात शिक्षण आणि संपत्ती साठविण्याचा आधिकार फक्त ब्राम्हन लोकांनाच आहे. त्या मुळे असा कायदा पास झाला तर सर्व आधिकार आणि निर्णय हे ब्राम्हनच घेतील आणि आमचे लोक
आधिकारापासून वंचीत रहातील. त्या पेक्षा वोट देण्याचा आधिकार हा २१ वर्षे पूर्ण असलेल्या
व्यक्तिलाच मिळावा.
*४* पर्याप्त प्रतिनिधित्व :
(adeguate representation) स्वतंत्र मतदार संघामध्ये *sc, st यांच्या मधून लोकसंखेच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळणार होते. पण ह्याच पुणे करारा मुळे संयुक्त मतदार संघ लागू झाला आणि आज पर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाहीत.
*१९५२ च्या निवडणुकीत काश्मिरी ब्राह्मण पंडीत जवाहरलाल नेहरु नी ६०% ब्राह्मणांना टिकिट देऊन ५६% ब्राह्मण निवडुण आणले आणि स्वतंत्र भारतात पुन्हा ब्राह्मणशाही स्थापण केली आणि संपुर्ण भारतावर ब्राह्मणांनी वर्चस्व पुनस्थापित केले*
डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारतात दोनदा निवडणूक हरले. अत्यंत विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्ट. ज्याने देशाचे संविधान लिहिले आहे तो हरतो आणि काँग्रेसचे दलाल गांधी निवडणूक जिंकतात. डॉ. आंबेडकर जेव्हा विदर्भातून निवडणूक हरले, तेव्हा कांग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांना विजयी सभेसाठी निमंत्रण दिले आणि सांगितले की, बाबासाहेब राजकारणात एक जिंकतो आणि दुसरा हारतो. कांग्रेसने तुमच्या जातीच्या भाऊराव बोरकराला विजयी केले आहे, तुम्ही विजय सभेला निमंत्रित आहात. बाबासाहेब विजय सभेला गेले आणि आपल्या भाषणात म्हणाले...
*हत्ती खाली बसला आणि गाढव उभ राहिलं, तरीही बसलेला हत्ती उभा असलेला गाढव हा हत्तीच्या उंचीचा नसतो. कारण हत्ती हा हत्ती असतो आणि गाढव हा गाढव असतो*
पुणे करार झाल्यामुळे स्वतंत्र मतदार संघ (Separate Electorate) ऐवजी संयुक्त मतदार संघ (Join Electorate) लागु झाला. त्यामुळे आज पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतात व नंतर आपण त्याला Vote देतो. पक्षाचे Suprimo उमेदवार निवडतांना उमेदवार किती नालायक आहे, ते समाजासोबत किती गद्दारी करतात हे बघतात व नंतरच ते उमेदवाराला टिकट देतात. त्यामुळे आपले खरे उमेदवार निवडले जात नाही. हा सर्व परीणाम पुणे कराराचा आहे.
*************
mn sonawane pune
*************